Type Here to Get Search Results !

नंदिनीचा भाजपा नेते नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते सन्मान

पोलीस दलात निवड झाल्याबद्दल नंदिनीचा भाजपा नेते नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते सन्मान 


नाशिक प्रतिनिधी 

 स्पर्धा परीक्षे च्या मार्फत नुकत्याच पार पडलेल्या धुळे शहर पोलीस दलात सिडकोतील नंदिनी सपकाळे हिने यश संपादन केले असून भाजप ज्येष्ठ नेते नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते नंदिनीचा सन्मान  करण्यात आला. 
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदासाठी नुकतीच भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रक्रियेमध्ये सावता नगर सिडको येथील नंदिनी योगेश सपकाळे हिने घवघवीत यश संपादन केले असून धुळे शहर पोलीस दलात तिची निवड झाली आहे या यशाबद्दल भाजपा जेष्ठ नेते नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नंदिनीचा सन्मान केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नंदिनीचे वडील योगेश सपकाळे,बाबाजी अहिरे,गोपीनाथ सोनवणे, हरिभाऊ आढाव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments